दि.31ऑगस्टला रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान फिर्यादी ज्ञानेश्वर राऊत हे उमराव चौधरी यांच्या घरी गणेशाचे जेवण करण्याकरिता गेले असता तिथे गावातील रिमचंद कटरे हे जेवणाकरिता आले व बाजूला बसले.यावर आरोपी रिमचंद कटरे यांना जेवन करण्याकरिता विचारले असता तू मला विचारणारा कोण असे बोलून भांडण करीत असताना आरोपीचा मुलगा हा काठी घेऊन आला व तू माझ्या वडिलांसोबत भांडण करतोस का म्हणून काठीने फिर्यादीच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले.फिर्यादी राऊत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.