बल्लारपूरातील गोपाला पॅलेस येथे जिल्हा भाजपा महिला मोर्चाने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करून त्याठिकाणाहून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना राख्या पाठविल्या. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच मंडळांतून लाडक्या बहिणींकडून जमा झालेल्या १८ हजार राख्या मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. यासोबतच येत्या काही दिवसांत पुन्हा ०४ हजार राख्या पाठविण्यात येणार आहेत. या शुभप्रसंगी आवर्जून उपस्थित राहून लाडक्या बहिणींकडून स्नेहपुर्वक राखी बांधली.