सोनगाव बंगला येथे २ वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या खहुयात पडून बुडून मृत्यू फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सोनगाव बंगला ता. फलटण येथे घराच्या जवळ असलेल्या पाण्याच्या खड्डयत पडून बुडून यश चैतन्य लांडगे वय २ रा. सोनगाव बंगला याचा मृत्यू झाला. त्या बाबतची खबर त्याचे चुलते धर्मराज बाबासो लांडगे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. २३ रोजी पावणे एक वाजता दिली असून याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक नागवडे या करत आहेत.