लोकप्रिय आमदार सन्माननीय आशिषरावजी देशमुख साहेब तसेच डॉ. राजीवजी पोद्दार साहेब व श्री मनोहरजी कुंभारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खापा येथे नुकतेच संजय गांधी निराधार योजना संदर्भात एक शिबीर आयोजित केले गेले. या शिबिरात गावातील अनेक निराधार, विधवा, वयोवृद्ध तसेच गरजू लोक सहभागी झाले होते.शिबिरामध्ये शासनाच्या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मिळणाऱ्या विविध लाभांची माहिती देण्यात आली.