स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा हर घर स्वच्छता हा अभियान राबविला जात आहे. हा अभियान ८ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविला जाणार आहे. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पुयार येथील शालेय विद्यार्थ्यांचे रॅली काढण्यात आली. ही रॅली संपूर्ण पुयार गावातून काढण्यात आली असून या रॅली मधून जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग दर्शवला होता. विद्यार्थ्यांकडून हर घर तिरंगा हर घर स्वच्छता असे नारे दिले.