आज मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेषतः आम्ही महाराष्ट्रातील पूरसदृश परिस्थितीचा आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. तपासणीनंतर आम्हाला आढळले की सुमारे ६० लाख हेक्टर जमीन बाधित झाली आहे.