कळमना हातीत राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन पीडीतेची दोन वर्षांपूर्वी आरोपी करीम अंसारी वय 25 वर्ष याच्या सोबत इंस्टाग्राम वर ओळख झाली होती. नंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले व नंतर दोघांचे भेटणे सुरू झाले यादरम्यान दिनांक 28 एप्रिल 2025 ला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडीतेला स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.