राहुरी तालुक्यातील आरडगाव शिवारात गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रात्रीच्या सुमारास जेरबंद झाला आहे. या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. आज गुरुवारी पहाटे दादासाहेब काळे यांच्या शेतामध्ये हा बिबट्या पकडला आहे.