सांगोला तालुक्यातील वाढेगाव बसस्थानकाजवळ सोलापूर स्थानिक गुन्हे शाखा व सांगोला पोलिस स्टेशनच्या पथकाने अचानक छापा टाकून मटका घेताना एकास रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून रोख २,१२० रुपयांसह जुगार साहित्य जप्त केले. याप्रकरणी शब्बीर शमशुद्दीन खतीब (रा. वाढेगाव, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून ही कारवाई शनिवारी दुपारी ३:२० च्या सुमारास करण्यात आली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल यश देवकते यांनी फिर्याद दिली.