साकेगाव येथील अवैद्य दारू विक्रीमुळे संपूर्ण गावाला त्रास होत होता. त्यामुळे माता-भगिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. या विरोधात गावातील कांताबाई धोत्रे, नंदाबाई लष्कर, लक्ष्मीबाई लष्कर, व आदी महिलांनी दारूबंदीसाठी गावातचउपोषण सुरू केले होते. या उपोषणाची माहिती आमदार श्वेता महाले यांना समजताच त्यांनी प्रशासनाच्या अधिकारी यांना सोबत घेऊन दारूबंदीचे सक्त निर्देश दिले. व आमदार महाले यांच्या मदतीने दिनांक 4 सप्टेंबर रोजी या या उपोषणाची सांगता करण्यात आली.