दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील कंदलगाव रस्त्याजवळील जोडमोटे वस्तीत एका घरातून चोरीची घटना उघड झाली आहे. रकमाबाई नागनाथ कडते (वय ६०) यांच्या घरात रविवारी रात्री साडेबारा वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश करून तीन तोळे सोने आणि 50 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. रकमाबाई कडते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. रात्री नातू मल्लिकार्जुन जोडमोटे सोबत जेवण केल्यानंतर दुसरा नातू नागेश जोडमोटे बाहेर गेला.