जयस्तंभ चौकात सोडण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणावर फायटरने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना 13 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता घडली. फिर्यादी दिपक देवेंद्र बघेले (26, रा. कारंजा, गोंदिया) हे पॅथालॉजी टेक्निशियन असून रुग्णाचे रिपोर्ट देवून परतत असताना आरोपी शिवम वैद्य (30, रा. वसंतनगर, गोंदिया) याने त्यांना थांबवून जयस्तंभ चौकात सोडण्याची मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यामुळे आरोपीने शिवीगाळ करत फायटरने चेहऱ्यावर मारहाण केली. यात फिर्यादीचे तीन दात तुटून जबड्याला गंभीर दुखापत झा