गावात येण्यास मज्जाव करत एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या दोन नातेवाईकांना दगड आणि विटांनी मारून जखमी करण्यात आले. ही घटना शनिवारी (३० ऑगस्ट) रात्री ओझर्डे येथील भैरवनाथ मंदिराजवळील रस्त्यावर घडली.या प्रकरणी अभिषेक शाम गायकवाड (२६, ओझर्डे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.