वाळवा मध्ये कृष्णा नदीत होड्यांच्या शर्यती संपन्न वाळवा मध्ये कृष्णा नदीपात्रात होड्यांच्या शर्यती पार पडल्या. भाजपा नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त होड्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यती वाळवा आणि शिरगाव दरम्यानच्या कोट भागातील सरकारी घाट ते जुना शिरगाव पाणवठा दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला