भुसावळ शहरातील आनंद नगरातील गोल्डन अवर हॉस्पीटल व भाजपाचे माजी नगरसेवक निक्की बतरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग 21 मधील सिंधी समाजबांधवांसाठी मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते तीन वाजेदरम्यान बडा सेवा मंडलमध्ये आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर पार पडले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात 60 नागरिकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. शिबिरात रक्तदाब, मधूमेह, कार्डीओग्राम (ईसीजी) तपासणी आणि औषधोपचार मोफत करण्यात आला.