पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत राहणारी १९ वर्षीय पीडिता ही वर्धा येथुन डोंगरगाव येथे आली असता, तिने तिच्या परिचीत आरोपी नामे हितेन्द्र संतलाल मंडलीये वय २२ वर्ष रा. भंडारा, ह.मु. हिंगणा, नागपूर यास हिंगणा येथील बसस्थानकावरून घरी सोडण्याकरीता बोलाविले होते. आरोपीने पीडितेस घरी सोडल्यानंतर तो पीडितेस मला पाणी पेयाचे आहे. असे सांगुन पीडिता ही पाणी आणण्यास गेली असता आरोपीने जबरीने पीडितेस बेडरूम मध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केला. घटनेची तक्रार तक्रारदाराने हिंगणा पोलिस ठाण्यात केली आहे.