सुमारे 2 महिन्यापूर्वी व रविवारी सायंकाळी 7 वाजता गणेश हिंदुराव शेंडगे (रा.आदर्की बुद्रुक) याने आदर्की बुद्रुक ता. फलटण येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन घरासमोर येवून माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण पळुन जाऊन लग्न करु असे म्हणुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.पोलीसानी शेंडगे याला ताब्यात घेवून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी फलटण यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस अधिक तपास करीत आहेत.