‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणीला गती आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी १८ जुलै रोजी दुपारी चार वाजता दिली. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय असल्याने नोंदणी होत आहे,असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत शहरी व ग्रामीण क्षेत्रातील मिळून तब्बल २ लाख ५४ हजार ४८९ जणींची नोंदणी झाली आहे. मुख्यमंत्री; माझी लाडकी बहिण या योजनेची नाव नोंदणी सुरु असून ही नोंदणी प्रत्यक्ष गावातच केली जात आहे.