आज दिनांक 26 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता भोकरदन तालुक्यातील पारद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी माहिती दिली आहे की अनवा गावात सर्व शांतता आहे,पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात असून कोणीही कुठे गेले नाही,अफवांवर विश्वास ठेवू नये,काही दिवसापूर्वी हेमाडपंथी महादेव मंदिरात मास टाकल्याची घटना घडली होती,त्यामुळे गावात काही काळ तणाव होता मात्र आता शांतता आहे,अशी माहिती त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दिली आहे.