आरमोरी–गडचिरोली महामार्गावर झालेल्या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या युवकांपैकी दोन युवकांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता आणि दोन युवकांचा उपचार दरम्यान दुःखद मृत्यू झाला होता. तसेच दोन जखमी युवकांना तात्काळ हेलिकॉप्टरच्या मदतीने नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. या दोन्ही युवकांची प्रकृती सध्या स्थिर आहे.गडचिरोली पोलिसांकडून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोलीस स्टेशन गडचिरोली येथे भारतीय न्याय संहिता कलम 105 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.