पत्नीकडे पाहुन हातवारे करीत असल्याने समजावून सांगण्यासाठी गेलेल्या हॉटेल व्यावसायिकासह त्यांच्या मित्राला एका टोळक्याने शिवीगाळ करून लाकडी दंडुक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे.ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नांदेपाटील वस्ती परिसरात शुक्रवारी (ता.5) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत एकजण जखमी झाला आहे.