मुक्ताईनगर शहरापासून जवळ असलेल्या पुर्णाड फाटा येथे जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता केलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी लाखो रुपये किमतीचा अवैध गुटखा आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला आयशर ट्रक (एमएच ४० सीडी ९३५८) जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.