नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर आंभोरा परिसरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रात मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. शैलेश एकनाथ धारगावे वय 43 राहणार आवरमारा असे मृतकाचे नाव आहे. आंभोरा येथील वैनगंगा नदीच्या पात्रात मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासून साठी ग्रामीण रुग्णालय कुही येथे पाठविण्यात आला.