वैनगंगा नदी घाटातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी वाहतूक केली जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत रेती चोरी करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडल्याची घटना घडली. ही घटना ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आकोट ते चिचाळ मार्गावर घडली. या घटना पोलिसांनी लिंगेश्वर राजेश्वर भुरे (२५) रा आकोट व राजेश्वर मुरलीधर भुरे (५५) यांच्या विरोधात अड्याळ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.