नगर-मनमाड रस्ता दुरुस्तीचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी रस्ता कृती समितीने आज बुधवारी सकाळी राहुरी फॅक्टरी येथे केलेल्या रास्ता-रोको आंदोलनात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची देखील गाडी आंदोलनकर्त्यांनी अडवल्याने काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने जिल्हाधिकाऱ्यांना पर्यायी मार्गाने शिर्डीकडे जावे लागले. सुमारे तासभर झालेल्या या रस्ता रोकोने अनेकांची तारांबळ उडाली होती.