राहुरी पोलीस ठाण्यातील अत्याचाराच्या गुन्हातील आरोपीने त्याच्याच सख्या मेहुण्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाल्यानंतर आरोपी बजरंग साळुंके,राहणार दवणगाव यांच्या विरोधामध्ये राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर असे खून झालेल्या इसमाचे नाव असून त्याच्या मृतदेहाचा सांगडा आज मंगळवारी दुपारी दवणगाव शिवारातील एका शेतातून पोलिसांनी उकरून काढला आहे.