गणेश उत्सव व ईद-ए-मिलाच्या पार्श्वभूमीवर उपनगर पोलिसांचा रूट मार्च. नाशिकरोड ,गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या पार्श्वभूमीवर उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील संवेदनशील भागात आज (दि.३) संध्याकाळी रूट मार्च घेण्यात आला. या रूट मार्चचे नेतृत्व सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी (नाशिक रोड विभाग) यांनी केले. यात उपनगर पोलीस स्टेशनचे २ पीआय, २ एपीआय, २५ पोलीस कर्मचारी, नाशिक रोड पोलीस स्टेशनचे १ पीआय व १० कर्मचारी, देवळाली कॅम्पचे १ पीआय व २ कर्मचारी, एसआरपीएफचे १