कोथरूड परिसरातील कचरा डेपोमध्ये गेल्या महिन्याभरापासून तब्बल २ ते ३ हजार टन कचरा साठून राहिला असून कोणत्याही प्रकारचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे.सध्या गणेशोत्सवाच्या काळात कचऱ्याचे प्रमाण झपाट्याने वाढले असून पुढील नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे.