वर्धा शहरातील 'तान्हा पोळा' हा पारंपरिक सण एका वेगळ्याच उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा झाला. हा सण म्हणजे बळीराजाचा आणि त्याच्या सोबत्याचा, म्हणजेच बैलाचा, सण आहे. या वर्षी वर्ध्याच्या आर्वी नाका परिसरात आज 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता लहान मुलांसाठी खास 'तान्हा पोळा' आयोजित करण्यात आला होता.