गिरड येथे खासदार अमर काळे यांच्या सौजन्याने स्वाथ वृक्ष फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांनीसाठी गर्भाशय व मुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन विकास विद्यालयात घेण्यात आले होते.यावेळी गिरड येथील विकास विद्याल,जिल्हा परिषद मुलिंची शाळा, गुरुकुल विद्या निकेतन, बालपांडे पब्लिक स्कूल येथिल विद्यार्थ्यांना लस देण्यात आली या लसीकरण शिबिराला स्वाथ वृक्ष फाउंडेशनचे प्रतिनिधी प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स आशा स्वयंसेविकांनी सहकार्य केले.