खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील 36 वर्षीय तरुण मंगळवार दि.२३ सप्टेंबर पासून बेपत्ता झाला होता. पोंदेवाडी - खडकवाडी (ता. आंबेगाव) या दोन्ही गावांच्या हद्दीत असलेल्या पाझर तलावाच्या काठावर बेपत्ता तरुणांचे कपडे सापडल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत तलावात त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नाही. आज अखेर त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.