उदगीर तालुक्यातील लिंबगाव येथे शेतीच्या वाटणी वरून लोखंडी रॉड मारून जखमी केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात २१ ऑगस्ट रोजी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता लिंबगावं येथे फिर्यादीने चुलत्यास शेत मोजनी करून घेऊ असे सांगितले असता चुलत्याने शेताची मोजणी करायची नाही म्हणून शिवीगाळ करून भांडणाची कुरापत काडून गैर कायद्याची मंडळी जमवून लोखंडी रॉड व साखळीने मारहाण करून जखमी केले