बँकेतून काढून कारच्या डिक्कीत ठेवलेले दोन लाख रुपये चहा पिण्यासाठी गाडीतून उतरल्यानंतर अज्ञात चोरट्याने लांबविले. ही घटना गुरुवार २८ रोजी सकाळी कुडूवाडी बायपास रोडजवळील बंद टोल नाक्याजवळ घडली. याबाबत संतोष लक्ष्मण गोरे (रा. सापटणे भो., ता. माढा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. उसतोड मुकादमाला पैसे देण्यासाठी म्हणून बँकेतून दोन लाख रुपये त्यांनी काढले. चोरट्याने पाठलाग करत संधी साधून ते पळवले आहेत.