आज दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच, त्यांनी सायबर गुन्हेगारीचा तपास करणाऱ्या 'Cyfi Unit' चे आणि 'ई-संवाद' या नव्या उपक्रमाचेही अनावरण केले. या उद्घाटन सोहळ्यामुळे सानपाडा परिसरातील पोलीस यंत्रणा अधिक अद्ययावत होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कोनशिला अनावरण करून नूतन इमारतीची पाहणी केली.