कामठी परिसरात दुकानाचे शटर तोडून चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीमध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा देखील समावेश आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी शिवांग फाये, गुरप्रीत सिंग भाटिया, मोहम्मद मिराज मोहम्मद सलीम अन्सारी यांना अटक केली असून यातील आरोपी आसिफ बेचू हा फरार आहे ज्याचा शोध पोलीस घेत आहे. आरोपीकडून विविध पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा खुलासा केला असून 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.