पुरंदर तालुक्यातील सासवड येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ व भैरवनाथ व जोगेश्वरी देवीचा यात्रा उत्सव आज पासून सुरू झालाय... आज दिनांक 24 एप्रिल रोजी पहाटे देऊळवाड्यातील देवांना अभिषेक करून महा पूजा करण्यात आली व संपूर्ण पोशाखात देवांना साज व अलंकार घालण्यात येऊन उत्सवास सुरुवात झाली.