टेका नाका येथील विजय हनुमान मंदिरातून गाय चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून कपिल नगर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपी मध्ये प्रिन्स उर्फ पिंटू उपाध्याय, शेख इब्राहिम उर्फ सरकार शेख हरून, अब्दुल इरफान अब्दुल इब्राहिम व सलीम खान तजुमुल खान यांचा समावेश आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा ची नोंद करण्यात आली असून आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार व एक बर्गमन मोपेड असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.