22 तारखेला रात्री साडेदहाच्या ते अकराचे सुमारास आर्वी टी पॉईंट येथे नाकेबंदी केली असताना गावठी मोहा दारूची वाहतूक करताना दोघे आढळून आले पोलिसांनी प्रेम नरोदास भोसले 22 वर्षे राहणार भिवापूर सारवाडी आणि शाहरुख गोपीलाल पवार 21 वर्ष राहणार देववाडी सारवाडी तालुका कारंजा या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून स्पेंडर हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच 31 /92 58 ,,,12 लिटर क्षमतेच्या सहा प्लॅस्टिक पन्या 72 लिटर गावठी मोहा दारू असा एकूण जुमला किंमत ६४४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला