गडचिरोली जिल्ह्रातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्याथ्र्यांना योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाया विद्याथ्र्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेत मागे पडत आहेत. करीता शालेय विद्याथ्र्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरीक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, यासाठी गडचिरोली पोलीस प्रयत्न करत आहेत.