जालना तालुक्यातील विरेगाव येथील अज्ञात चोरट्यांनी 2 दुकाने फोडली. 6 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास.. मौजपुरी पोलिसांकडून तपास सुरू. आज दिनांक 23 सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. जालना तालुक्यातील विरेगाव येथील एका सोन्या-चांदीच्या दुकानासह कृषी सेवा केंद्रावर ही चोरी झालीय. या प्रकरणात चोरट्यांनी तब्बल 6 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरट्यांनी विरेगाव येथील मयूर पुरुषोत्तमराव दुसाने यांच्या