प्रेम संबंधातून झालेल्या भक्ती मयेकरचा खून प्रकरणातील तपास आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. रत्नागिरीतील वाटद- खंडाळा येथील सायली देशी बार मधून पोलिसांना भक्ती मयेकरचा मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहे. या मोबाईल मुळे या गुन्ह्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.