राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर विश्वास ठेवून, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास मीरा-भाईंदर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी केरोन अग्रवाल, हरीश परमार, काँग्रेस सेवादलाचे गुलाम मोहम्मद शेख, सामाजिक कार्यकर्ते जाफीर शेख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.