बीड शहराजवळ इमामापूर रोड लगत लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. मृताचे नाव जयराम बोराडे असून तो भाटसांगवी येथील रहिवासी होता.मंगळवार दि.9 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.