22 ऑगस्ट ला दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिऊन गाडी चालवणं किती धोकादायक असू शकतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. 22 ऑगस्ट च्या मध्यरात्री विमानतळ परिसरात नुकताच एक भीषण अपघात घडला, ज्यात एक महिला दारूच्या नशेत टाटा पंच ईव्ही चालवत होती. भरधाव वेगात असलेल्या या कारने एका उभ्या असलेल्या ह्युंदाई कारला मागून जोरदार धडक दिली.हा अपघात इतका भीषण होता की ह्युंदाई कार विमानतळाच्या भिंतीवर आदळली आणि भिंत तुटली. घटनेनंतर ही महिला घटनास्थळावरून फरार झाली.