जगप्रसिद्ध वेरुळ येथे एटीएम फोडून तब्बल १६ लाख ७० हजार रुपयांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला असून सलग १८ दिवसांच्या तपासानंतर अटक झालेल्या चौघांची गावभर धिंड काढून जनतेसमोर उघडकीस आणण्यात आली. भोसले चौक आणि वेरुळ लेणी परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांनी ही धिंड पाहिली. या कारवाईत पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आव्हाड, हेडकॉन्स्टेबल कोल्हे, ताठे, किशोर गवळी, जाकीर शेख व खटके यांनी सहभाग घेतला.