आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे देशातील बहुतांश लोकांची उपजीविका कृषीवरच अवलंबून आहे व अश्यात शेती हा मुख्य व्यवसाय असणाऱ्या गावातच बैलपोळा न भरणे हे एक नवलच म्हणावं लागेल असंच काही आर्णि तालुक्यातील शेलु (ब्रा ) या गावची परिस्थिती होती . मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग असणाऱ्या या गावात गेली जवळपास २५ वर्षापासून बैलपोळाच भरत नव्हता . शेतकरी आपली बैलजोडी मारोतीच्या पारावर नेऊन तोरण नसल्यामुळे तसेच घरी परतायचे. बैलपोळा हा जगाच्या पोशींघाचा जिवाभावाचा दोस्त बैला प्रती उतराई होण्याचा