चिखली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रकाश मानसिंग सपकाळ यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यास आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला आणि निवृत्तीपश्चात वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. भास्करराव वाघमारे गटशिक्षणाधिकारी पं. स. चिखली, डॉ. श्री. प्रतापसिंग राजपूत, डॉ. श्री. कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, सौ. मनिषाताई सपकाळ, श्री. प्रवीण वायाळ गट समन्वयक पं. स. चिखली, आदी मान्यवर उपस्थित होते.