विरार येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळून 17 नागरिकांचा मृत्यू झाला तर नऊ नागरिक जखमी झाले. या घटनेनंतर धोकादायक स्थितीत असलेल्या रमाबाई अपार्टमेंटची दुसरी विंग वसई विरार शहर महानगरपालिकेने तातडीने कारवाई करत तोडली आहे. जेसीबी, क्रेनच्या सहाय्याने तोडक कारवाई करत धोकादायक स्थितीत असलेली इमारतीची दुसरी वेिंग जमीनदोस्त करण्यात आली.