तालुक्यातील निमगाव सावा येथील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कुकडी नदीचे पात्रात अशोक खंडू गाडगे हा 26 वर्षाचा युवक गेला असता तो पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्याचा शोध स्थानिक तरुण व पोलीस यंत्रणा करीत आहे. सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यासाठी तो नदीच्या पात्रात उतरला होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.