ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शुल्कात अन्यायकारी वाढ करुन शासनाने सामान्य माणसांसाठी जागतिक ख्यातीच्या व्याघ्र प्रकल्पाचे दर्शन स्वप्न ठरवुन स्थानिकांवर अन्याय करत आहे. याबाबत क्षेत्रसंचालक कार्यालय, मूल रोड, चंद्रपूर येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शुल्क वाढी संदर्भात चर्चा झाली. या बैठकीला क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल आणि संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.